देशभक्तीची स्फुर्तीगाथा सांगणारा "राजगुरू वाडा"

 खरं तर भटकंतीदरम्यान आपण कितीतरी जुन्या प्राचीन  वास्तू पाहत असतो. या वास्तुंना  इतिहासाचा संदर्भ असतो तर काही वास्तू ह्या स्थापत्यकलेने आणि त्यावरील कलाकुसरींनी नटलेल्या असतात. तर काही वास्तू ह्या त्या-त्या शहराची ओळख बनतात. अश्या अनेक सुंदर वास्तू आपल्या जवळपास घेऊन पुणे जिल्ह्यातील खेड हे शहर उभं आहेपुणे -नाशिक या रस्तेमाहामार्गावर राजगुरूनगर म्हणजेच खेड हे गाव आपल्याला लागत.गावाच्या नावाचा इतिहास मोठा रंजक आहे.हे गाव तसं प्राचीन . सध्याच्या राजगुरूनगराचं प्राचीन काळात नाव होत "खेटक".काही इतिहासकार "खेट" असंहि  सांगतात. याला   शिलालेखाचा संदर्भही देतात.गावातल्याच सिद्धेश्वर मंदिरातील शिलालेखात "खेट" म्हणून उल्लेख आला आहे. अपभ्रंशाने या नावाचं पुढं खेड असे नामकरण झाले असावे.आता हे तालुक्याचं ठिकाण झालंय पण या गावाला पुढं ओळख मिळाली ती हुतात्मा राजगुरू यांच्यामुळे.देशासाठी भगतसिंग-सुखदेव आणि राजगुरू यांनी मोठं बलिदान दिल.आणि राजगुरू यांची जन्मस्थान असलेले हे खेड नंतर राजगुरूनगर म्हणून मान्यता पावलं. हि वास्तू तर या शहराची  शानच...  पण एव्हढेच नव्हे तर या तालुक्याच्या परिघात म्हणजे पूर्वेस असणारे जुने वाडे ,स्मारके आणि देवस्थाने यांची अक्षरशः रेलचेल आहे. खेडच्या पश्चिम भागाला सह्याद्रीची  कूस लाभली आहे तर  पूर्व कडील भाग हा काहीसा सपाटीवरचा त्यामुळे पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमीच.तरी पण हा भाग ग्रामीण सौंदर्यामुळे डोळ्यांचे पारणेच फेडतो. आणि याच भागात असणारे वाडे तर या भागाचे सौंदर्य शतपटींनी वाढवतात. अश्याच काही वास्तूंची ओळख करून घेऊ यात.


राजगुरू यांचा वाडा 

शिवराम हरी राजगुरू हे नाव जरी  उच्चारले तर भगतसिंग आणि सुखदेव यांची नावे डोळ्यासमोर येतातच. हे तिघेही म्हणजे भारतीय इतिहासाची सोनेरी पानेच जणू.  भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या   या अशा थोर क्रांतिकारकांमुळेच आपल्या स्वातंत्र्यलढ्याला धार आली. इंग्रज अधिकाऱ्याला ठार केल्याप्रकरणी जुलमी इंग्रजांनी या तिघांनाही फाशी दिली हा इतिहास सर्वानाच ठाऊक आहे. अशा राजगुरूंचा राहता वाडा आपल्या पुणे जिल्हयातील राजगुरूनगर या गावातील भीमा नदीच्या किनारी उभा आहे.

रमणीय अशा भीमा नदीचे दृश्य 

गावात आपण कोणालाही विचारले तरी वाड्याची जागा लोक दाखवितात.आता तर जागोजागी फलकही लावलेले आहेत. अरुंद बोळीतून आत आलो कि  राजगुरूंच्या वाडय़ाचे प्रवेशद्वार दिसते. या प्रवेशदारातून आत आलो कि डाव्या हाताला थोरला वाडा म्हणून पती दिसते. जुन्या पद्धतीची रूंद चौकट, त्याच्यावरील साधे परंतु सुबक असे रेखीव नक्षीकाम, आपल्या खणखणीत, जाडजूड दरवाजांसह  आपल्या नजरेत भरते. चौकटीवरील गणेशपट्टी आणि कोरीव काम अजूनही स्पष्टपणे दिसते. दोन्ही दरवाजे त्यावरील कोरीव कामामुळे आजही आपले  सौंदर्य टिकवून आहेत हे विशेष

कौलारू असलेला वाडा 



लाकडी कलाकुसरीने नटलेला वाडा 



भुयारी मार्ग 



वाड्याचे अंतरंग 

आत गेलो कि दोन मजली लाकडी इमारतीच्या खोल्या दिसतात. हे पाहून बाहेर आलो कि मग काही पायऱ्या उतरून आपण राजगुरूंच्या जन्मखोलीच्या जागेकडे येतो.अजूनही हि वास्तू तशीच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.कौलारू छत असलेल्या वास्तूत तीन खोल्या दिसतात. एका खोलीत त्यांचा जन्म झालेला ,दुसरी देवखोली तर सुरुवातीला प्रशस्त हॉल दिसतो. हि संपूर्ण वास्तू सजवलेली आहे ती क्रांतीकारकांच्या सचित्र माहितीने.या वास्तूत घालवलेल्या क्षणांनी आपण अक्षरशः आपण भारावून जातो.  हि माती-वीट आणि कौलांपासून बनलेली हि वास्तू म्हणजे तरुनानासाठीची सफर्तिस्थानेच आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.  या वाड्याला खेटूनच असलेल्या भीमा नदीच्या पात्राने या वास्तूचे सौंदर्य शतपटींनी वाढवलेले दिसते.


वाड्यात असलेली राजगुरू यांची प्रतिमा 


सहकुटुंब 






वाड्यात असलेल्या वहीत प्रतिक्रिया लिहिण्याची सोय उपलब्ध आहे



जाण्याचा मार्ग

पुणे – नाशिक रस्ते महामार्गावरील खेड (राजगुरुनगर) – पोलीस स्टेशन – राजगुरु यांचा वाडा 


पूर्वप्रकाशित साप्ताहिक लोकप्रभा   




Comments

  1. खुपच सुंदर असे वर्णन...
    एवढ्या वेळा राजगुरुनगर मध्ये गेलो असेल पण शहीद राजगुरू यांचा वाडा कधीच पाहीला नाही....
    पुढच्या वेळेस आवर्जून वाडा पाहून पुढचा प्रवास सुरु करेल...

    ReplyDelete
  2. ओंकारजी नेहमी प्रमाणे हा पण तुमचा ब्लॉग छान व माहिती पूर्ण आहे .
    श्री विकास चिथडे बदलापुर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळशी ...एक सुंदर गाव !!

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग