नांदेड जिल्ह्याचे अव्दितीय रत्न - कंधारचा भुईकोट !!
भुईकोट हा दुर्ग भटकंतीमधील सोपा प्रकार.बऱ्याच जणांचा कुतुहलाचादेखील विषय.जमिनीवर बांधलेल्या किल्ल्यांना भुईकोट म्हणतात.त्यामुळे किल्ल्यांचा हा प्रकार पर्यटनाच्या दृष्टीने वृद्ध , स्त्रिया यांच्या सोयीचा.याच कारणामुळे बऱ्याच भुईकोटांवर कुटुंबकबिल्यासहीत पर्यटक फिरताना दिसतात.आता राहिला मुद्दा कि ..किती भुईकोट चांगल्या अवस्थेत आहेत.. ?? हा.तर याचे उत्तर "हातावर मोजण्याइतकेच थोडे भुईकोट अस्तित्वात आहेत.हे वास्तव जरी जळजळीत आणि कटू असले तरी सत्य आहे.कारण अवघड , अतिउंच असलेल्या डोंगरीकिल्ल्यांपेक्षा या अशा जमिनीवर बांधलेल्या किल्ल्यांवर मनुष्याचे अतिक्रमण अतिशय जलदगतीने झाले.यांची तटबंदी घरांच्या आडोसे बनले. कितीतरी भुईकोटांच्या तटबंदीलगत झोपडपट्ट्या आश्रयाला आल्या.यांचे खंदक गावातल्या गटारी बनल्या.किल्ल्यांमधील वस्तूंचे , इमारतींचे दगड , चौकटी , दरवाजे नागरीकरणासाठी वापरले गेले.इतिहासाविषयी असलेली आपली प्रचंड अनास्था हेच आपल्या बहुकोटांच्या दुर्दशेचे कारण झाले आहे.अशा दुर्मिळ वस्तू ह्याच आपला वैभवशाली वारसा आहेत हेच आपण सोयीस्कररीत्या विसरलो आहे.त्यामुळेच झालंय काय ...