काही-काही गावांना
ओळख ही इतिहासातून मिळालेली असते. किंबहुना या अशा गावांच्या नावातूनच इतिहास
डोकावतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ‘तळेगाव’
हे नावही हेच अधोरीखीत करत. ‘तळेगाव’ हे नाव मराठे शाहीतील पराक्रमी सरदार खंडेराव
दाभाडे यांना इनामात मिळालेलं. त्यामुळेच
या नावाच ‘तळेगाव दाभाडे’ असं नामकरण लोकांच्या मुखी झालं. मावळ तालुक्यातील एक
महत्वाच शहर... तसचं मुंबई – पुणे या दोन शहरांदरम्यानच्या रस्ते आणि लोहमार्ग या
दोहोंवरील मध्यभागी महत्वाचा थांबा असलेलं आणि पेन्शनरांच आवडतीच ठिकाण असलेल्या या
तळेगावच्या वेशीवरून किंवा खुद्द तळेगावातून आपण जुन्या महामार्गाद्वारे बऱ्याचदा
जात असतो. त्यावेळी तळेगावची भौगोलिक ओळख असलेली दोन तळी आपलं लक्ष वेधून घेत असतात. तळेगावला ओळखण्याची ही महत्वाची खुण.
असो
तळेगावचा एवढा परिचय करून देण्याचा उद्देश
हाच की, या तळेगावात पाहण्यासारखं बरंच
काही आहे. सरदार दाभाडे यांचा वाडा, गो.नी. दांडेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांनी वास्तव्य केलेली निवासस्थाने, महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एकेकाळी भर
घालणारा पैसाफंड काचकारखाना, शिक्षण महर्षी अण्णासाहेब विजापूरकर यांनी उभी केलेली
शिक्षणसंकुले.. असं बरच काही. पण धार्मिक अंगाने पहायला गेलो तर एक नाव आपल्याला आश्चर्याचा मोठा धक्काच देते. ते म्हणजे “पाच पांडव मंदिर”! हे नाव ऐकून आपण दचकतो. कारण गणपती, मारुती, विठोबा, रामराया, भवानी माता अशा मंदिरांची नाव ऐकायची सवय आपल्याला असते आणि त्यातच असं कधीही
न ऐकलेल्या मंदिराच नाव समोर येते. तेही पाच पांडवांच्या मंदिराच. या
मंदिराच्या उल्लेखाने डोळे चमकतात. पण खरतरं या पाच पांडव मंदिरांच वैशिष्ट्य
येथेच संपत नाही. कारण हे मंदिर संपूर्ण
भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याची माहिती मिळते अन आपण आणखीनच सर्द होतो.
सभोवतालचीअनेक बुजुर्ग किंवा ऐंशीपार असलेली वृद्ध मंडळी पांडवांच्या काळात
पांडवांनीच निर्माण केलेल्या मंदिरांची,
लेण्यांची आख्यायिका आपल्याला सांगत असतात आणि बहुतेक वेळा अशी ठिकाणे आपण पाहून देखील आलेली असतो. पण येथे मात्र गोष्ट अगदी उलट दिसते. ती म्हणजे खुद्द पांडवांचच
मंदिर बांधलं गेलंय. त्यामुळेच ते मंदिर कधी एकदा पाहतो असं होतं. आणि याच ओढीने
आपला मोर्चा या मंदिराकडे वळला जातो.
 |
पाचपांडव यांच्या भिंतींवर चितारलेल्या मुर्त्या
|
 |
पाचपांडव यांच्या भिंतींवर चितारलेल्या मुर्त्या
|
तळेगावला
येण्यासाठी लोहमार्ग आणि रस्ते महामार्ग असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहे. या
दोन्हीपैकी कुठल्याही मार्गाने तळेगावला आलो की. थेट चावडी चौक गाठायचा. या
चावडीच्या मागेच नागरीवस्तीत सामावलेलं छोटेखानी मंदिर नजरेस पडत. एका दगडी चौथ्यावर
उभं असलेलं मंदिर जेव्हा आपण पाहतो तेव्हा मंदिराची उत्सुकता आणखीनच ताणून धरली
जाते. मंदिराच्या पाच-सहा पायऱ्या चढून आपण
आतमध्ये प्रवेश करायचा अन समोर दिसणाऱ्या पाच पांडवांच्या मुर्त्या पाहून स्तब्धच
व्हायचे. साधारण साडेचार फुट उंचीच्या बैठ्या अवस्थेत असलेल्या पाच पांडवांच्या
मुर्त्या एकाशेजारी एक अशा एका ओळीत आहेत. डाव्या बाजूने सुरुवात केल्यास धर्मराज
युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकूल,सहदेव अशा या मुर्त्या पहिल्या खोलीत आहे. धर्मराज
युधिष्ठिर आणि भीम या दोन मूर्त्यांच्या मधोमध भिंतीला एक छोटीशी खिडकी दिसते. याच
खिडकीतून आपल्याला द्रौपदीचे दर्शन होते. पण ही मूर्ती पूर्णपणे पाहण्यासाठी
आपल्याला आतल्या खोलीत जावे लागते. आत गेलो की, एका छोट्याशा चौथऱ्यावर द्रोपदी
एका कुशीवर नीजलेल्या अवस्थेत दिसून येते. पुर्वी या द्रौपदी विषयी आख्यायिका अशी
सांगितली जायची की, ही दर सहा महिन्यांनी कूस बदलते वैगेरे...वैगेरे... पण शेवटी ही आख्यायिकाच! पण अशा आख्यायिकाच या
आगळ्यावेगळ्या मंदिराच वेगळेपण जपत रचल्या गेलेल्या असतं. याच नव्हे तर यासारख्या
अनेक आख्यायिका येथे ऐकविल्या जातात. त्या म्हणजे पाच पांडव वनवासात असताना
तळेगावी आले. तेव्हा द्रौपदी ही दमल्यामुळे
तिने काही काळ विश्रांती घेतली. ते ठिकाण म्हणजेच हे मंदिर. तर काही जण असेही
सांगतात की. खुद्द पांडवांनीच हे मंदिर बांधले. आपणही अशा आख्यायिका मनापासूनच
ऐकायच्या. अन या आगळ्यावेगळ्या मंदिराच्या दर्शना नंतर माघारीवळायचे.
 |
मंदिरातील उजव्या कुशीवर झोपलेली अवस्थेतील द्रौपदी
|
 |
मंदिराच्या डाव्या कोपऱ्यात असलेली विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती
|
आपण
अवतीभवती अनेक मंदिरे पहात असतो . कित्येकजण दररोज न चुकता मंदिरात जाऊन नतमस्तकदेखील होत असतात. तर काहीजण मंदिर
भेटीसाठी गावांच्या-राज्यांच्या- देशांच्या सीमा ओलांडत असतात. मंदीराच वास्तूस्थापत्य-मूर्ती-इतिहास-दर्शनाची
ओढ हीच कारणे या मागे असतात आणि या यादीत जर दुर्मिळात दुर्मिळ असलेलं पाच पांडव
मंदिराचं नाव आले की मग आपणही आनंदित होतो अन वेगळ काही पहायला मिळेल त्यासाठी
इकडे धावही घेतो आणि येथे आल्यावर हे मंदिर देखील आपल्याला निराश करीत नाही.
 |
पुरातन काळाची साक्ष देणारे पाचपांडव मंदिर
|
Sundar Mahiti..sopya bhashet..with interesting writing
ReplyDeleteधन्यवाद
DeleteMasta
ReplyDeleteधन्यवाद
Deleteथोडक्यात पण खूप छान ओळख !!
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान लिहिलंय.. वाचून मंदिर पाहण्याची उत्सुकता आणखी वाढते...!!!
ReplyDelete