Posts

Showing posts from September, 2020

मुळशीच्या खोऱ्यात.....गोठं आणि भादसकोंडा लेणं

Image
  मुळशीच्या खोऱ्यात                 एकदा का भटकंतीचा ध्यास घेतला की , मग सुट्टीच्या दिवशी पावलं घरात थांबतच नाहीत. पाठीवर सॅक अडकवून वेगवेगळी भटकंतीची ठिकाणे शोधून त्यावर फिरण्याची हौस बरेच हाडाचे दुर्गमित्र भागवित असतात. यातही नेहमीच्या रूळलेल्या वाटांपेक्षा अनवट , ऑफबीट ठिकाणांकडेही बऱ्याच ट्रेकर्स मंडळींची पावले फिरताना दिसतात. “ आठवडामाजी फिरत जावे ” या उक्तीप्रमाणे कुठेतरी जावून आलंच पाहिजे , हा ध्यास घेवून जंगले-अभयारण्ये , प्राचीन हेमाडपंथी मंदिरे , नद्या , विहिरी , वाडे आदी ठिकाणे धुंडाळणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. काहीतरी वेगळं पाहण्याचा ध्यास बरेच जण बाळगतात. यातच मग मुळशी खोऱ्यातली दोन अनवट नाव समोर येतात. गोठं आणि भादसकोंडा अशा दोन आगळ्यावेगळ्या लेण्यांची.                 पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या पश्चिमेकडील म्हणजेच सह्याद्रीच्या कुशीतला भाग हा अक्षरशः डोळ्यांचे पारणेच फेडणारा आहे. याच तालुक्यातून जाणारा आणि...

देखणा “बामणडोह”

Image
            महाराष्ट्रातल्या अनेक गावांत विहिरी दिसतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गावात तर आवर्जून दिसतात. या अशा गावांपैकी एक गाव म्हणजे तळेगाव दाभाडे! मराठेशाहीतील पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालेलं हे गाव इतिहासाच्या पाउल खुणा अंगावर घेऊन उभं आहे. याच गावात काही ऐतिहासिक वास्तू आपल्याला दिसतात. यातलीच एक सुंदर आणि सुरेख वास्तू म्हणजे एक अदभूत विहीर. हिलाच स्थानिक भाषेत “बामणडोह” म्हटलं   जात. पुर्वी विशिष्ट समुदायांना   सरदारांकडून अथवा राजांकडून विहिरी बांधून दिल्या जात असत. अशीच एक विहीर तळेगावात बांधून दिली गेली. ब्राम्हण समुदायाला अथवा वस्तीला   बांधून दिलेल्या या विहिरीला “बामणडोह” असे नाव पडले, असे अनेक इतिहास अभ्यासक सांगतात. तर अशा विहिरी या राजस्त्रियांच्या  स्नानासाठी बांधल्या जात असत असही काही अभ्यासकांच मत आहे. कारण काहीही असो, पण अशा विहिरी असतात मात्र सुरेख !            गोल-गोल किंवा चौकांनी अशा आकाराच्या या विहिरींभोवती इतिहासाच वलय तर असतेच ...

आगळ-वेगळ “पाच पांडव मंदिर”

Image
               काही-काही गावांना  ओळख ही इतिहासातून मिळालेली असते. किंबहुना या अशा गावांच्या  नावातूनच इतिहास डोकावतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ‘तळेगाव’ हे नावही हेच अधोरीखीत करत. ‘तळेगाव’ हे नाव मराठे शाहीतील पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात  मिळालेलं. त्यामुळेच या नावाच   ‘तळेगाव दाभाडे’ असं नामकरण लोकांच्या मुखी झालं. मावळ तालुक्यातील एक महत्वाच शहर... तसचं मुंबई – पुणे या दोन शहरांदरम्यानच्या रस्ते आणि लोहमार्ग या दोहोंवरील मध्यभागी  महत्वाचा थांबा  असलेलं आणि पेन्शनरांच आवडतीच ठिकाण असलेल्या या तळेगावच्या वेशीवरून किंवा खुद्द तळेगावातून आपण जुन्या महामार्गाद्वारे बऱ्याचदा जात असतो. त्यावेळी तळेगावची भौगोलिक ओळख असलेली दोन तळी आपलं लक्ष वेधून घेत  असतात. तळेगावला ओळखण्याची ही महत्वाची खुण.           असो तळेगावचा एवढा   परिचय करून देण्याचा उद्देश हाच की, या तळेगावात   पाहण्यासारखं बरंच काही आहे. सरद...

धबाबा लोटती धारा....!!

Image
  पाऊस म्हटंल की धबधब्याच नाव ओघाने येतेच. किंबहुना पाऊस आणि धबधब्याच नातच मुळी पर्यटनाच्या विश्वात महत्वाच समजल जाते. दोघांचा अविष्कार हा पाहण्याजोगाच असतो. एकंदरीतच धबधबा जेवढा आकर्षक, सुंदर दिसतो, तसाच तो अनुभवासादेखील वाटत असतो. पावसाच्या दिवसात तर सह्याद्रीच्या डोंगररांगात तर धबधब्याचा असंख्य माळा साद घालताना दिसतात. डोंगराच्या कातळ कड्यावरून जीवाच्या आकांताने उड्या मारणाऱ्या या पाण्याच्या प्रवाहाने जसे भटक्यांना, पर्यटकांना वेड लावले आहे तसेच साहित्यक्षेत्रातील कवी, लेखकांनाही लावले आहे. नवसाहित्यिकांना तर पाऊस आणि धबधब्याशिवाय दुसरा सुंदर आधार बहुधा कुठलाही नसेल, इतकी यात शब्दांची सृजनशीलता भरलेली दिसून येते. समर्थ रामदासांनीही शिवथरघळी समोरून पडणाऱ्या धबधब्याचे किती सुंदर वर्णन केलंय पहा ना...   "गिरीचे मस्तकी गंगा तेथुनि चालली बळे   धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे" धबधब्याच रौद्रसुंदर रूप, शेकडो फुटावरून कोसळणाऱ्या प्रपाताचा धीरगंभीर आवाज, पाण्याच्या प्रवाहाची होणारी नयनरम्य हालचाल या साऱ्या गोष्टीना नजरेत सामावून घेणे म्हणजे मोठे अवघड काम. धबधब्याच हे रूप ...