Posts

पारनेरचा तालुक्याचा "वैभवशाली" वारसा !!

Image
  पारनेरचा वैभवशाली  वारसा पारनेर हा अहमदनगर मधील तालुका पुणे जिल्ह्याला अगदीच खेटून आहे.या पारनेरचं ऐतिहासिक आणि प्राचीन महत्वही मोठे आहे. असं म्हणतात कि पराशर ऋषींच्या नावावरून या गावाला पारनेर हे नाव पडलं.पराशर ऋषी म्हणजे महाभारतकार व्यासमुनी  यांचे पुत्र. यावरून या गावाचे पौराणिक महत्त्वही लक्षात येईल. याच पारनेर तालुक्यात बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.जामगाव येथील महादजी शिंदे यांचा वाडा , टाकळी-ढोकेश्वराची अप्रतिम लेणी आवर्जून पाहण्यासारखी आहेत.पण यात सर्वात देखणी  वास्तू आहे ती सिद्धेश्वर  मंदिराची. अशाच पारनेरच्या परिसरातील हि भटकंती आपल्या डोळ्यांना सुखावल्याशिवाय राहत नाही. निसर्गरम्य सिद्धेश्वर देखणं मंदिर , निसर्गरम्य भवताल आणि हवी-हवीशी शांतता अश्या त्रिवेणी संगमात हे मंदिर सजलंय. त्यामुळेच सहकुटुंब सहलीसाठी हे ठिकाण "मस्ट वॉच" या श्रेणीतच मोडतं. पारनेर या तालुक्याच्या गावावरून सिद्धेशवर वाडीकडे एक डांबरी रस्ता जातो.याच वाडीत आपण पोहोचायचे.हि वाडी आहे पारनेरपासून तीन किमी अंतरावर.याच ठिकाणी एका खोल दरीत हे सिद्धेश्वर मंदिर उभारलं आहे.खूपच भन्नाट जागा आहे हि

मानमोडी डोंगरातली "अंबा-अंबिका लेणी"

Image
  पुणे जिल्हयातील जुन्नर तालुका म्हणजे लेण्यांचे आगारच . कारण याच तालुक्यात   जवळपास दीडशे पेक्षा अधिक  लेण्या पाहायला मिळतात. या साऱ्या लेण्या आजूबाजूंच्या डोंगराच्या पोटात खोदलेल्या दिसतात.  यातल्या बहुतांश लेण्या या हिनयान या बौद्ध पंथाच्या असून त्या तिस-या शतकातील असल्याचं इतिकारांचं मत आहे. असाच एक लेणीसमूह मानमोडी डोंगराच्या पोटात खोदलेला आहे.तसं पाहिलं तर या मानमोडी डोंगरात तीन लेणी समूह आहेत.तीनही लेणी समूह अतिशय देखणे आहेत. अंबा-अंबिका , भूतलेणी आणि भीमाशंकर लेणी अश्या नावाची हि खोदकाम म्हणजे मानवी कलाकृतीचा सर्वोत्कृष्ट आविष्कारच ! या तीनही लेण्या एकाच वेळी पाहून होतात. याच मानमोडी डोंगरातील लेण्यांची सफर आपण करणार आहोत.    पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या जवळच साधारण 1.5 कि.मी अंतरावर घोडेगाव रस्त्यावर  असलेल्या डोंगराला मनमोडीचा डोंगर असे म्हटले जाते. अगदी रस्त्यावरून सुद्धा या लेण्या डोळ्यांना सहजपणे दिसून येतात.  या डोंगरावर जाण्याचा मार्ग खोरे वस्ती मधुन  जातो किंवा या डोंगराच्या पायथ्याशी काही पोल्टर फार्म आपल्याला दिसतात.यांच्या शेजारूनच आपल्याला लेण्यांकडे जाण्य

अध्यात्म आणि पर्यटनाचा गोदावरी -प्रवरा संगम

Image
  मुळात नद्यांचा संगम पाहणे हाच मुळी आनंदयोग ठरावा. आपल्या संस्कृतीत  तर नदीला  जीवन वाहिनी असे म्हटले आहे. दोन वेगवेगळ्या प्रदेशातून वाहत आलेल्या नद्या या त्या-त्या खोऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. तिथली संस्कृती हि त्या प्रवाहात सामावलेली असते. हे सारे अभ्यासून गेलो कि मग ह्या नद्यांचा संगम हा आणखीनच देखणा होतो.असंच काहीसे चित्र   मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या  सीमेवर असलेल्या कायगाव व टोका या दोन गावात पाहायला मिळते. या दोन्ही गावांचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाजवळ असलेला अनोखा आणि अभूतपूर्व असा दोन नद्यांचा संगम. अहमदनगर जिल्ह्यातून वाहत येणारी व जिला अमृतवाहिनी असे नाव आहे ती “ प्रवरा ” व नाशिकहून येणारी व जिला  दक्षिणगंगा  असे नाव आहे ती गोदावरी अश्या दोन नद्या यांचा संगम झाला आहे किंवा ज्या ठिकाणी एकत्र येतात ते कायगाव टोका हि  गावे . अद्भुत असे दृश्य टोका गावाजवळील घाटावरून आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः सूर्योदयाचा देखावा अपूर्व असाच असतो. पुर्व दिशेच्या किरणांनी झाकोळलेला नदी काठ पाहणे यासारखे दुसरे स्वर्गीय सुख दुसरे नाही.आणि इथे तर दोन नद्यांचा मिलापच...मग काय विचारूच नका