Posts

Showing posts from September, 2023

पारनेरचा तालुक्याचा "वैभवशाली" वारसा !!

Image
  पारनेरचा वैभवशाली  वारसा पारनेर हा अहमदनगर मधील तालुका पुणे जिल्ह्याला अगदीच खेटून आहे.या पारनेरचं ऐतिहासिक आणि प्राचीन महत्वही मोठे आहे. असं म्हणतात कि पराशर ऋषींच्या नावावरून या गावाला पारनेर हे नाव पडलं.पराशर ऋषी म्हणजे महाभारतकार व्यासमुनी  यांचे पुत्र. यावरून या गावाचे पौराणिक महत्त्वही लक्षात येईल. याच पारनेर तालुक्यात बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.जामगाव येथील महादजी शिंदे यांचा वाडा , टाकळी-ढोकेश्वराची अप्रतिम लेणी आवर्जून पाहण्यासारखी आहेत.पण यात सर्वात देखणी  वास्तू आहे ती सिद्धेश्वर  मंदिराची. अशाच पारनेरच्या परिसरातील हि भटकंती आपल्या डोळ्यांना सुखावल्याशिवाय राहत नाही. निसर्गरम्य सिद्धेश्वर देखणं मंदिर , निसर्गरम्य भवताल आणि हवी-हवीशी शांतता अश्या त्रिवेणी संगमात हे मंदिर सजलंय. त्यामुळेच सहकुटुंब सहलीसाठी हे ठिकाण "मस्ट वॉच" या श्रेणीतच मोडतं. पारनेर या तालुक्याच्या गावावरून सिद्धेशवर वाडीकडे एक डांबरी रस्ता जातो.याच वाडीत आपण पोहोचायचे.हि वाडी आहे पारनेरपासून तीन किमी अंतरावर.याच ठिकाणी एका खोल दरीत हे सिद्धेश्वर मंदिर उभारलं आहे.खूपच भन्न...