मानमोडी डोंगरातली "अंबा-अंबिका लेणी"
पुणे जिल्हयातील जुन्नर तालुका म्हणजे लेण्यांचे आगारच . कारण याच तालुक्यात जवळपास दीडशे पेक्षा अधिक लेण्या पाहायला मिळतात. या साऱ्या लेण्या आजूबाजूंच्या डोंगराच्या पोटात खोदलेल्या दिसतात. यातल्या बहुतांश लेण्या या हिनयान या बौद्ध पंथाच्या असून त्या तिस-या शतकातील असल्याचं इतिकारांचं मत आहे. असाच एक लेणीसमूह मानमोडी डोंगराच्या पोटात खोदलेला आहे.तसं पाहिलं तर या मानमोडी डोंगरात तीन लेणी समूह आहेत.तीनही लेणी समूह अतिशय देखणे आहेत. अंबा-अंबिका , भूतलेणी आणि भीमाशंकर लेणी अश्या नावाची हि खोदकाम म्हणजे मानवी कलाकृतीचा सर्वोत्कृष्ट आविष्कारच ! या तीनही लेण्या एकाच वेळी पाहून होतात. याच मानमोडी डोंगरातील लेण्यांची सफर आपण करणार आहोत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या जवळच साधारण 1.5 कि.मी अंतरावर घोडेगाव रस्त्यावर असलेल्या डोंगराला मनमोडीचा डोंगर असे म्हटले जाते. अगदी रस्त्यावरून सुद्धा या लेण्या डोळ्यांना सहजपणे दिसून येतात. या डोंगरावर जाण्याचा मार्ग खोरे वस्ती मधुन जातो किंवा या डोंगराच्या पायथ्याशी काही पोल्टर फार्म आपल्याला ...