"पवना-इंद्रायणी- आंद्रा” नद्यांच्या खोऱ्यात……
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागालाअसणाऱ्या मावळ तालुक्याला परिसस्पर्श झालाय पवना आणि इंद्रायणी या दोन मुख्य नद्यांचा . या दोन नद्या म्हणजे मावळच्या संस्कृतीची प्रतीकेच . या दोन नद्यांनी मावळ खऱ्या अर्थाने सुजलाम - सुफलाम केला . तसं पाहिलं तर माणूस आणि नदी यांचं नातेच मुळी अगदी घट्ट आहे . याच नद्यांच्या तीरावर आपली संस्कृती रुजली , टिकली आणि विस्तारली . मानवी संस्कृतीच्या विकासात या अशा नद्यांचं योगदान अतिशय मोलाचे आहे . प्राचीन काळी आर्य हे सिंधू नदीच्या काठावर राहिले आणि त्यातूनच पुढे सिंधू संस्कृतीचा उगम झाला हे सर्वानाच माहित आहे . हेच नव्हे तर कितीतरी समुदाय हे भारतातील विविध नद्यांच्या काठी स्थिरावले आणि नदीच्या काठावरच त्यांची प्रगती झाली . मानवी व्यवहारही याच नद्यांनी पाहिले . अशा रीतीने नदी हि आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली . म्हणूनच या नद्या आपल्यासाठी देवत्त्व म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या . सह्याद्रीच्य...