Posts

Showing posts from September, 2021

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील "गणेशरूपे"

Image
  महाराष्ट्राचे लाडके आराध्यदैवत असणाऱ्या गणेशाचा उत्सव भाद्रपद महिन्यात सुरु होत असतो. अनेकजण आपल्या लाडक्या बापाच्या दर्शनासाठी उत्सुक असतात .आजूबाजूला असणाऱ्या मंदिरातून बाप्पांचे दर्शन आपण घेत असतो. यात आपली सह्याद्रीची कूस मागे कशी राहील. आडवाटेवर असणाऱ्या   जंगलात , गडकोटांची वाट तुडविताना , दुर्गयात्रींना - पर्यटकांना तसेच फिरस्त्यांना गणेशाच्या विविध रूपांचे दर्शन होतच असते.तसं पाहिलं तर संघर्षाच्या -युद्धाच्या काळात बहुतांशी गडकिल्ल्यांवर तसेच पायथ्याच्या गावात गणेशाच्या रूपानं एक अधिष्ठान गरजेचे असायचेच.विघ्न दूर करणाऱ्या गणेशाचे दर्शन अनेक जण संकटात घेतंच असतात.अश्याच आडवाटेवरच्या तसेच दुर्गम भागातल्या काही गणेशाची तसेच त्यांच्या प्रतिमांचीही सफर करून घेऊ यात.... गणपती गडद ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेला आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला खेटून असणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर-रांगांतील दुर्ग धाकोबा किल्ल्याच्या कुशीत गणपती गडद नावाची लेणी कोरलेली आहे.नावातच गणेशाचं अस्तित्व घेऊन असलेली हि लेणी आपली उत्सुकता चाळविल्याशिवाय राहत नाही.नाणे आणि दाऱ्या अश्या दोन प्राचीन घाटवा...

ऐतिहासिक तळेगावच्या पाऊलखुणा

Image
  पेन्शनरांच शहर , पुणे-मुंबई या दोन शहरांमधलं एक महत्वाचं मध्यवर्ती ठिकाण, पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालेलं गाव. अशी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणाऱ्या तळेगावची ओळख बहुसंख्यांना आहे. नव्याने विकसित होऊ घातलेली औद्योगिक वसाहत, शैक्षणिक संकुले. यामुळे जुन्या तळेगावच रूप झपाट्याने पालटू लागलं आहे. एकेकाळी इतिहासात प्रसिद्ध असलेलं हे गाव आता शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करू लागले आहे. तरीपण येथील काही ठिकाणे आणि स्थान मात्र अजूनही जुन्या काळाची साक्ष देत उभी आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती  मार्गाने अथवा मुंबई-बेंगळूरु जुन्या रस्ते महामार्गाने तळेगाव हे गाव लागते. पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तळेगाव स्थानक आहे.   देखणा “बामणडोह”   तळेगावात काही ऐतिहासिक वस्तू आपल्याला दिसतात. यातलीच एक सुंदर आणि सुरेख वस्तू म्हणजे एक अदभूत विहीर. हिलाच स्थानिक भाषेत “बामणडोह” म्हटलं   जात. पुर्वी विशिष्ट समुदायांना   सरदारांकडून अथवा राजांकडून विहिरी बांधून दिल्या जात असत. अशीच एक विहीर तळेगावात स्मशान भूमी शेजारी बांधून दिली गेली. ब्राम्हण समुदायाला अथवा...