Posts

Showing posts from January, 2021

आंदर मावळची अपरिचित "पद्मावती लेणी"

Image
  सह्याद्रीच्या डोंगररांगांवर कितीतरी लेण्या लपलेल्या आहेत. त्यातील काही लेण्या जागतिक नकाशावर पोहोचल्या, काही लेण्या वीकेंडची पर्यंटनस्थळे म्हणून पसंतीस उतरल्या. पण तरीही कित्येक लेण्या स्वत:चं अस्तित्व कसंबसं सांभाळत आजही पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहेत. येथे पोहोचण्याच्या वाटा या खडतर तर आहेतच शिवाय भटकंतीचा कसही पाहणाऱ्या आहेत. पण तरीही त्यांना दुर्लक्षून चालणार नाही. अशा अपरीचित लेण्यापैकीच एक पद्मावती लेणी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यात आंदर मावळात उभी आहे. त्याच लेणीची ही सफर. डोंगराच्या पोटात दिसणारी पद्मावती लेणी   सह्याद्रीच्या रांगेत उभ्या असलेल्या डोंगरांचं कवतिक हे काही तुम्हा-आम्हाला सांगायची गरज नाही. एक मात्र खरं. सह्याद्रीनं आपल्या पदरी टाकलेलं दान मात्र कधीही न संपणारं आहे.आजही तुम्ही सह्याद्रीच्या कुशीतल्या ग्रामीण भागात गेला की, तिथे तुम्हाला जाणवेल की, छोट्या टेकड्यांना आणि डोंगरांनाही त्यांनी वेगळी नावे दिलीत आणि त्यांना दंतकथेत सामावून घेतलयं. या सह्याद्रीवर फिरण्यासारखे बरेच आहे. पण आपण मात्र नेहमीच्याच आणि प्रसिद्ध ठिकाणांकडे वळत असतो. त्यामुळे बरी...

निसर्गरम्य “पाटगाव”

Image
                 कोल्हापूरचा दक्षिणेकडचा भाग तसा भटक्यांसाठी नंदनवनच पण सर्वसामान्यांसाठी कायमच अपरिचित राहिला आहे.निसर्गाची मुक्तहस्ते उधळण लाभलेला हा परिसर डोळ्यांचे पारणेच फेडतो. भुदरगड तालुका हा या भागातच मोडतो. खणखणीत रांगणा , भुदरगड हे किल्ले या भागातलेच. या तालुक्यात गड-किल्ले-जंगलें-मंदिरे यांची अक्षरश रेलचेल आहे.या तालुक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली कित्येक ठिकाणे हि पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहे. "पाटगाव" हे त्यापैकीच एक.इतिहासात मन रमविणाऱ्यांना हे नाव नवीन नाही. कारण याच गावात शिवकाळात एक योगीपुरुष होऊन गेले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदरस्थानी आणि गुरुस्थानी असलेल्या मौनी महाराजांचे नितांतसुंदर समाधी मंदिर वेदगंगा नदीच्या काठावर पाटगावात उभे आहे.ते पाहण्यासाठी एकदा तरी वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.                 कोल्हापूरपासून साधारण ९० किमी अंतरावर असलेल्या पाटगाव येथे येण्यासाठी कागल-गारगोटी मार्गे जाता येते.कागल सोड...