Posts

Showing posts from October, 2020

मावळच्या खोऱ्यातील “तासुबाई”

Image
 महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर ‘कळसुबाई’ देवीचे छोटेसे मंदिर आहे. हे सर्वानांच माहित आहे. सह्याद्रीच्या सर्वोच्च माथ्यावर वसलेले लाल रंगाचे मंदिर तिथे येणाऱ्या प्रत्येकालाच मोहित करत. केवळ हेच मंदिर नव्हे तर सह्याद्रीच्या इतरही शिखरावर किंवा गड किल्ल्यावर देव- देवतांची विविध रूपे आपल्याला भटकंतीदरम्यान दिसत असतात. किंवा त्याबद्दल आपण वाचत तरी असतो. एवढेच नव्हे तर कित्येक गड- किल्ले तर अशा देव- देवतांच्या नावानेच ओळखले जातात. त्यामुळे एखाद्या खेड्यात आपण जरी गेलो, तरी गावातल्याच टेकडीवर छोटस मंदिर हमखास दिसतच दिसत. इतक घट्ट नाते डोंगरांशी येथल्या देवतांच आहे. यातली काही ठिकाणे प्रसिद्ध पावली तर काही मात्र तेवढ्या भागापुरतीच मर्यादित राहील. या अशा अप्रकाशित अपरिचित ठिकाणांमध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात डोंगराच्या कपारीत असलेले तासुबाई मंदीर हे वेगळे पण अनवट ठिकाण आहे. निसर्गाच भरभरून दान असलेल्या मावळ तालुक्यात पर्यटनासाठी बरीच ठिकाणे उभी आहेत. लोहगड- विसापूर- तुंग- तिकोना- मोरगिरी- कार्ला- भाजे अशी नावाची भलीमोठी जंत्रीच समोर येते. गड- किल्ले- लेण्या मंदीरे आदींबाबत मावळ भ...

सरदार दाभाडेंच्या तळेगावचं “बनेश्वर मंदिर”

Image
पेन्शनरांच शहर , पुणे-मुंबई या दोन शहरांमधलं एक महत्वाचं मध्यवर्ती ठिकाण, पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालेलं गाव. अशी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणाऱ्या तळेगावची ओळख बहुसंख्यांना आहे. नव्याने विकसित होऊ घातलेली औद्योगिक वसाहत, शैक्षणिक संकुले. यामुळे जुन्या तळेगावच रूप झपाट्याने पालटू लागलं आहे. एकेकाळी इतिहासात प्रसिद्ध असलेलं हे गाव आता मोठ्या शहराकडे वेगाने वाटचाल करू लागले आहे. तरीपण येथील काही ठिकाणे आणि स्थान मात्र अजूनही जुन्या काळाची साक्ष देत उभी आहेत. यातलच एक ठिकाण म्हणजे शंभू महादेवाचं बनेश्वर मंदिर ! बनेश्वर मंदिर  बनेश्वर या नावाच आणखी एक मंदिर मुंबई-बेंगरूळ महामार्गावर  नसरापूर (जि.पुणे) येथे पहायला मिळते. पण प्रस्तुत लेखातलं बनेश्वर मंदिर म्हणजे सरदार दाभाडे यांच्या काळात अठराव्या शतकात उभारले गेलेलं. त्यामुळेच या मंदिराला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे. म्हणूनच एका मंदिराची सुंदर अनुभूती घेण्यासाठी आपला मोर्चा तळेगावकडे वळवायचा. तळेगावला येण्यासाठी लोहमार्ग आणि रस्तेमार्ग असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत. तळेगावात आलो की, बनेश्वर मंदिराच...