Posts

Showing posts from August, 2020

राजबिंडा- "राजगड!!!"

Image
‘‘राजियांचा गड अन् गडांचा राजा’’ अशी  बिरूदावली अभिमानाने मिरवनाऱ्या  राजबिंडा  या राजगडाचे स्थान हे दुर्गवेडयांच्या आणि भटकंतीच्या विश्वात  मानाचे तर आहेच, तसेच ते इतर सर्व दुर्गापेक्षा वेगळे देखील आहे. अशा  या किल्ल्याचे रांगडे, रूबाबदार रूप पाहण्यासाठी कित्येंक दुर्गयात्रींचे पाय हे या ठिकाणी कायमच वळत असतात. कितीही गड किल्ले पाहीले तरीही या गडाची बातच न्यारी! याचा इतिहास तर रंजक आहेच, शिवाय येथला भूगोलही आपल्या सारख्या पांथस्थांच्या डोळयांचे पारणे फिटवणारा आहे. त्यामुळे येथे का यायचे यासाठी कारणांची गिणतीच न केलेली बरी!  पावसाळ्यातला राजगड  वारकरी ज्या भावनने  पंढरपूरच्या विठुरायाची वारी दरवर्षी  नित्यनियमाने न चुकता  करीत असतात. अगदी त्याच भावनेने  अस्सल दुर्गयात्री या देखण्या राजगडाची मोहीम नेहमीच आखीत असतात. म्हणूनच राजगडाला आवडीने भटक्यांची पंढरीसुद्धा  म्हटले जाते ते  याच कारणामुळे. दुर्गभ्रमंतीची आवड आहे पण राजगड अजुन पहायचाय... असा दुर्देवी फिरस्ता तुम्हाला  शोधूनही सापडणार नाही आणि सापडलाच तरीही त्याच्यासा...

कातळधार...!!!

Image
पाऊस म्हटंल की धबधब्याच नाव ओघाने येतेच. किंबहुना पाऊस आणि धबधब्याच नातच मुळी पर्यटनाच्या विश्वात महत्वाच समजल जाते. दोघांचा अविष्कार हा पाहण्याजोगाच असतो. एकंदरीतच धबधबा जेवढा आकर्षक, सुंदर दिसतो, तसाच तो अनुभवासादेखील वाटत असतो. पावसाच्या दिवसात तर सह्याद्रीच्या डोंगररांगात तर धबधब्याचा असंख्य माळा साद घालताना दिसतात. डोंगराच्या कातळ कड्यावरून जीवाच्या आकांताने उड्या मारणाऱ्या या पाण्याच्या प्रवाहाने जसे भटक्यांना, पर्यटकांना वेड लावले आहे तसेच साहित्यक्षेत्रातील कवी, लेखकांनाही लावले आहे. नवसाहित्यिकांना तर पाऊस आणि धबधब्याशिवाय दुसरा सुंदर आधार बहुधा कुठलाही नसेल, इतकी यात शब्दांची सृजनशीलता भरलेली दिसून येते. धबधब्याच रौद्रसुंदर रूप, शेकडो फुटावरून कोसळणाऱ्या प्रपाताचा धीरगंभीर आवाज, पाण्याच्या प्रवाहाची होणारी नयनरम्य हालचाल या साऱ्या गोष्टीना नजरेत सामावून घेणे म्हणजे मोठे अवघड काम. धबधब्याच हे रूप डोळ्यांनी साठवताना दमछाक झाली की मग काही जण कॅमेऱ्याचा “क्लिक-क्लिकाट” सुरु करतात, तर काही शब्दांचा आधार घेऊन या धबधब्यांवर प्रेम करताना दिसतात. एकंदरीत सांगायचा मुद्दा हा की पाऊसात ...

"स्वर्गिय" नाणेघाट

Image
आपल्या महाराष्ट्रात पर्यटनासाठी  अनेक उत्तम वास्तू, किल्ले आहेत.गडकिल्ल्यांच्या शिवाय महाराष्ट्रातली भटकंती पूर्णच होऊ शकत नाही.भटक्यांच्या  जीवाला वेड लावणा-या या किल्ल्यांवरचं वातावरण काही वेगळंच असतं.केवळ किल्लेच नाही तर सह्याद्रीच्या पोटातले घाटरस्ते हाही असाच अनेकांचा आवडीचा विषय आहे.सह्याद्रीच्या पोटातल्या या  प्राचीन  सा-या वाटा पालथ्या घातल्या तरीही आपले मन काही भरत नाही.याच यादीतला आणि अग्रणी असलेला   असाच एक लहान थोरांचा आवडता स्पॉट म्हणजे नाणेघाट. हा प्राचीन भारताच्या महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. पूर्वीच्या काळात व्यापार करणं सोपं जावं म्हणून हा घाट आणि यासारख्या असंख्य घाट वाटा सह्याद्रीच्या पोटात खोदण्यात आल्या . असाच वैभवशाली  इतिहास असलेला आणि समुद्र सपाटीपासून २७२४ फूट उंच असलेल्या नाणेघाटाची सैर एकदा तरी केलीच पाहिजे. भारतीय प्राचीन संस्कृतीच्या खाणाखुणा आपल्या अवतीभवती नांदत असतात. अशा संस्कृतीची ओळख व त्यांचं अस्तित्वही अशाच खाणाखुणांतून आपल्याला ‘शोधावं’ लागतं. शोधावं लागतं असं म्हणायचं कारण की अशी ठिकाणं आप...