अध्यात्म आणि पर्यटनाचा गोदावरी -प्रवरा संगम
मुळात नद्यांचा संगम पाहणे हाच मुळी आनंदयोग ठरावा. आपल्या संस्कृतीत तर नदीला जीवन वाहिनी असे म्हटले आहे. दोन वेगवेगळ्या प्रदेशातून वाहत आलेल्या नद्या या त्या-त्या खोऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. तिथली संस्कृती हि त्या प्रवाहात सामावलेली असते. हे सारे अभ्यासून गेलो कि मग ह्या नद्यांचा संगम हा आणखीनच देखणा होतो.असंच काहीसे चित्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कायगाव व टोका या दोन गावात पाहायला मिळते. या दोन्ही गावांचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाजवळ असलेला अनोखा आणि अभूतपूर्व असा दोन नद्यांचा संगम. अहमदनगर जिल्ह्यातून वाहत येणारी व जिला अमृतवाहिनी असे नाव आहे ती “ प्रवरा ” व नाशिकहून येणारी व जिला दक्षिणगंगा असे नाव आहे ती गोदावरी अश्या दोन नद्या यांचा संगम झाला आहे किंवा ज्या ठिकाणी एकत्र येतात ते कायगाव टोका हि गावे . अद्भुत असे दृश्य टोका गावाजवळील घाटावरून आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः सूर्योदयाचा देखावा अपूर्व असाच असतो. पुर्व दिशेच्या किरणांनी झाकोळलेला नदी काठ पाहणे यासारखे दुसरे स्वर्गीय सुख दुसरे नाही.आणि इथे...