Posts

Showing posts from August, 2021

जल-व्यवस्थापनाचा आविष्कार असलेली "मंचरची बारव"

Image
  माणसाच्या जीवनात जल , अन्न आणि निवारा हे मूलभूत घटक आहेत. जल अर्थात पाणी या घटकाला तर विशेष महत्त्व आहे. माणसाने वस्ती करण्यास सुरुवात केली तीही जलसाठ्यांच्या किनार्‍यावरच केली. पृथ्वीवरील प्रार्थनास्थळांत असलेल्या देवदेवतांसाठीही माणसाने जलसाठे तयार केले. यावरून पाण्याला अतिशय महत्त्व आहे हे स्पष्ट होते.बारव म्हणजे काय ? हा प्रश्न अनेकांना पडतो. बारव , विहीर , पुष्करणी हि नावे जवळपास एकाच उद्दिष्टासाठी बनवलेले स्थापत्याचे प्रकार. विहिरीनंतरचा  सुधारित स्थापत्याचा अविष्कार हा बारव व त्यानंतर पुष्करणी असा आहे. बारव हा सुद्धा एक प्रकारचा जलसाठाच असतो. मात्र बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे गोल , चौरस वा किल्लीच्या आकारात बांधलेल्या या जलसाठ्यांना पायर्‍या असतात. म्हणूनच इंग्रजीत बारवांना स्टेपवेल म्हणतात. एकात एक लहान होत जाणारे तीन ते सात टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. म्हणजेच जमिनीलगत यांचा आकार मोठा व जस-जसे आपण खाली उत्तरात जाऊ तास-तसे ते निमुळते होत गेलेले आढळते.या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. म्हणजेच बारव ह्या अश्या जागी बांधल्या ग...