गौताळा अभयारण्याचे अंतरंग
सह्याद्रीच्या कुशीत असलेली जंगले-अभयारण्ये हा डोंगरभटक्यांचा आवडता विषय असतो.केवळ डोंगर भटकेच जंगलाच्या वाटेवर येतात असे नाही तर अरण्य वाचनाची आवड असणारे , पशु पक्षी निरीक्षण करणारे , जीवसृष्टीचा अभ्यास करणारे , जंगल वाटांवर चालताना आनंद वेचणारे , अनेक जण तुम्हाला येथे भेटतील.याला कारणच तसं आहे.सिमेंटच्या शहरांपेक्षा अभयारण्याला किंवा जंगलाला स्वतःचे असे वेगळे विश्व असते.डोंगरांनी वेढलेल्या या अश्या गर्द रानात माणसांची नेहमी होणारी घुसखोरी सोडली तर प्रत्येक सजीव घटक स्वतःच्या मर्यादेत आणि कक्षेत राहूनच इथल्या नियमांचे काटेकोर पालन करीत असतो.त्यामुळेच जंगल अतिशय शिस्तबद्ध अश्या चौकटीतच बांधलेले दिसते.जंगलाचा अविभाज्य भाग असणाऱ्या येथल्या प्रत्येक घटकाचे खास असे वैशिष्ट्य असते.आणि ते अनुभवताना मिळणार आनंद हा शब्दांचाही पलीकडे असतो.येथल्या नद्या-ओढे-धबधबे-रानवाटा-सरपटणारे जीव-पशु-पक्ष्यांचे विविध आवाज व त्यांचे ठसे-रानात दळवळणारा सुगंध...हे सारं काही जवळून आणि शांततेत अनुभवायचे असेल तर जंगलाशिवाय पर्याय नाही. एकदा का तुमचे पाऊल या अरण्यात पडलं कि मग नेहमीच्या शहरातल्या...