अस्सल कोकणमय प्रवास ...वालावल- नेरूरपार - धामापूर !!
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या पर्यटनाचा दृष्टीने अत्यंत महत्वाचा जिल्हा . या जिल्ह्यात पर्यटनाची खूप ठिकाणे उपलब्ध आहेत . याला कारण या जिल्ह्याला लाभलेला स्वच्छ समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीची डोंगररांग . त्यामुळे घाटावरच्या इतर जिल्ह्यांपेक्षा कोकणाची त्यातही सिंधुदुर्गाची पर्यटनस्थळे खूप वेगळी आहेत . कौलारू घरे , नारळी - पोफळीच्या बागा , हिरव्या रंगाचा कॅनव्हास धरणारी गर्द जंगले , हा तर कोकणी वातावरणाचा आत्माच . असा कोकणी टच तुम्हाला या जिल्ह्यात पदोपदी पाहायला मिळतो . पण बरेच जण सिंधुदुर्ग किल्ला , मालवण , सावंतवाडी या पलीकडे जाऊन पर्यटन स्थळे पाहत नाही . हि सारी पर्यटन स्थळे निर्विवाद सुंदर आहेच पण त्याहीपेक्षा सुंदर ठिकाणे या जिल्ह्यात लपलेली आहेत . कुडाळ आणि मालवण तालुक्याच्या सीमारेषेवरून कर्ली नदी वाहत गेली आहे . कर्ली नदी हि जिल्ह्यातील महत्वाची नदी . सह्याद्रीच्या डोंगरात उगम पावून हि नदी समुद्राला मिळते . या नदीच्या खोऱ्यात तीन सुंदर पर्यटन स्थळे लपली...