Posts

Showing posts from May, 2021

कृष्णेकाठचं "कोळे नृसिंह" मंदिर

Image
  विष्णूचे वर्णन ऋग्वेदापासून मिळते आहे. सृष्टीच्या पालनकर्त्यांचा मान तिला मिळाला. या कर्तृत्वविशेषाला अनुसरूनच तिला युगायुगात प्रगट व्हावे लागले. जेव्हा जेव्हा दुष्टशक्ती बळावत असते , तेव्हा तेव्हा सुष्टशक्तींना बळ देण्यास्तव श्रीविष्णूला पृथ्वीवर उतरावे लागत असे. या उतरण्यालाच अवतार म्हणायचे. मात्र सगळय़ाच अवतारासंबंधात एकच अनुस्यूत गोष्ट होती ती म्हणजे पृथ्वीचे रक्षण , याला कलीचा अवतार अपवाद समजावा. नृसिंह अवताराची पुराणात कथा येते त्याप्रमाणे विष्णुभक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी नृसिंह अवतार झाला असे मानले जाते. नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. या विषयीची अशी आख्यायिका प्रचलित आहे कि  हिरण्यकश्यपू या राक्षसाने तपश्चर्येने  ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले कि  ‘ हे भगवन , तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर , दिवसा अथवा रात्री , ना शस्त्राने ना अस्त्राने , भूमीवर अथवा आकाशात , प्राण्यां...