Posts

Showing posts from April, 2021

आंदर मावळातलं कातळसौंदर्य "कांब्रे लेणी" !

Image
मानवी मनाची सुंदर निर्मिती म्हणजे या लेण्या! हजारो वर्षापूर्वी कोरलेल्या या लेण्या डोंगराच्या कडे-कपा-यांत दिसून येतात. यातल्या बहुतेक पुरातन घाट-वाटांवर खोदलेल्या दिसून येतात. लेण्या म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ती नेहमीची आणि सरावाची नावं! भाजे, कार्ला, एलिफंटा, अजंठा-वेरूळ अशीच; पण या लेण्यांपलीकडेही बरीच नावं आजही उपेक्षित आहेत.आपण ठरावीक लेण्यांनाच प्रसिद्धी दिली. तिथे गर्दी केली. याला कारण या लेण्यांना असलेली सोयीसुविधा! ज्या लेण्यांसाठी रस्ते तयार झाले, त्याच लेण्या पसंतीस उतरल्या गेल्या. म्हणूनच या लेण्या लोकमान्यता पावल्या आणि सुरक्षित फिरण्यासाठी एक हॉट-स्पॉटच ठरल्या, परंतु पर्यटकांचं असं भाग्य इतर अपरिचित लेण्यांना मिळालं नाही. कारण अशा लेण्या आपल्या सोयी-सुविधांपासून ब-याच दूर आणि सह्याद्रीच्या कडेकपा-यात उभ्या आहेत.त्यामुळे अशा लेण्यांवर यायचं म्हटलं तर मनात कुतूहल आणि सह्याद्रीवर प्रेम असणं हे जास्त गरजेचं ठरतं! एकदा का हे मनोमन ठरवलं की मग काय अशा दुर्लक्षित लेण्यांची सौंदर्यकवाडे सदैव तुमच्या स्वागतास सज्ज दिसतील. अशीच एक सुंदर, दुर्लक्षित आणि तितकीच अपरिचित लेणी ...

भूम -परांडा तालुक्यातील भटकंती

Image
  मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या तालुक्यात काय आहे पाहण्यासारखे असे प्रश्न बरेच जण विचारतील.कारण हा भागही तसेच दर्शवितो.मुळात हा सारा परिसरच दुष्काळाच्या दाहकतेने कमी अधिक प्रमाणात होरपळून निघालेला आहे.पण तरीही या जिल्ह्यात भूम आणि परांडा तालुक्यातील दोन ठिकाणे नेहमीच खुणावत असतात.रखरखीत भूमीत वास्तू स्थापत्याने नटलेली दोन ठिकाणे उभी आहेत. अप्रतिम माणकेश्वर मंदिर आणि भुईकोट किल्ला   परांडा हि ती दोन ठिकाणे .आपण ब-याच वेळा देवदर्शनासाठी तुळजापूरला जात असतो.या भक्तिमार्गावरूनच थोडी वाट वाकडी केली की या दोन्ही ठिकाणांचे दर्शन होऊ शकते.   कमी श्रमात पाहून होणारी   आणि येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोयीस्कर असलेली   हि ठिकाणे   सर्व वयोगटातील भटक्यांसाठी उत्कृष्ट ठिकाने   आहेत .त्यांचीच सफर आपण करणार आहोत. परांड्याचा भक्कम   भुईकोट परांडा प्रवेशद्वार  परंडा किल्ल्याचे प्रवेशद्वार आतील बाजूने  गड किल्ले म्हणाले कि आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातले , कोकण किंवा नाशिक भागातल्याच ठिकाणांची यादी समोर येते.पण मराठवाड्यातहि...