Posts

Showing posts from December, 2020

‘मोरगिरी’च्या अपरिचित वाटेवर ...

Image
  खरंतरं एखाद्या रविवारी बाहेर कुठ जायचे आणि काय पहायचे ...? असा प्रश्न एखाद्या दुर्गभटक्याला कधी पडतच नसतो. कारण सह्याद्रीच्या कुशीत अनेक ज्ञात – अज्ञात ठिकाणे अक्षरशः ठाण मांडून बसलीत. यातील ज्ञात ठिकाणे म्हणजे अगदी सर्वसामान्यानांही माहित असलेली ठिकाणे म्हणजे यात सिंहगड, रायगड, कार्ला अशी ओळखीची नावे येतील. हि यादी सोडली तर अज्ञात/ अपरिचित यादीत बरेच नावे दिसतात. ठराविक गड- किल्ले- लेण्या- मंदिरे यांच्याही पलीकडे भटकंतीचे विश्व उभे आहे. यातलं बरचस अजुन तर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं देखील नाही. त्यामुळे यांच्याकडे काही मोजके पर्यटक सोडले तर इतर कोणी फिरकत देखील नाही. परंतु अत्यंत आडबाजूस/ आणि दुर्लक्षित असलेली हि ठिकाणे म्हणजे दर्दी भटक्यांसाठी मौल्यवान खजिनाच जणू! कारण अशा ठिकाणी मानवी गर्दी नसल्यामुळे याचं भौगोलिक कवच, निसर्ग हे बऱ्यापैकी मानवी आघातापासून दूर राहिलंय. त्यामुळे तेथे आले कि, मन हरखून जाते. येथेच गुंतून रहावसं वाटतं. या अशाच आडवाटेवर आणि इतिहासातही उल्लेख नसलेला एक किल्ला उभा आहे. मोरगिरी त्याचं नाव! खरतर हा किल्ला आहे कि टेहळणी चौकी याबद्दल अनेक इतिहास अभ्यासकां...